•गडब/सुरेश म्हात्रे
🌑राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली.
शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेह-यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत
यांनी केली. खोत यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसवाले देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम घेरत आहेत. आपण शेतकरी माणसे आहोत. आपल्याकडे गाय आहे. राज्याची तिजोरी म्हणजे ही
गायच आहे. देवेंद्र फडणवीस यांना या गायीचे सर्व दुध तिच्या वासरांना द्यायचे आहे. पण विरोधकांचा त्याला विरोध आहे. विशेषतः शरद पवारांना यामुळे आता आपल्या चिल्ल्यापिल्लांचे कसे होणार? ही चिंता लागली आहे, असेही सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले.