गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखल, गोवा गेट, गडब परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांची रेलचेल सुरू झाली आहे.
वडखल नाक्यावर हॉटेल एकविरा चायनीज सेंटरवर मोठ्या प्रमाणात गावठी तसेच विदेशी दारूची विक्री सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू पिऊन धिंगाणा घातला जातो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची रेल चेल सुरू आहे. सदर प्रकरणातील अन्सारी; नावाच्या मुख्य सूत्रधाराबाबत वडखळ पोलिसांना माहिती असूनही
सदर आरोपी मोकाट फिरत आहे. तसेच गोवा गेट परिसरात असणाऱ्या दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते.
सदर दुकानदारांवर मागे कारवाई झाली होते.
मात्र थोड्या दिवसांनी पुन्हा एकदा सदर दुकानदारानी गुटखा विक्री
सुरूच ठेवले आहे. या सर्व गोष्टींची
कल्पना पोलिसाना असून ही कोणतीच कारवाई केली जात नाही
तसेच गडब परिसरात सुनीता कडू
भर नाक्यावर गावठी दारूचा धंदा करीत आहे;सदर महिला गुटखा विक्री ही करीत आहेत.मागेच सदर महिलेवर वडखळ पोलिसांनी रेट केली होती. मात्र तिच्याकडे कोणताही ऐवज सापडला नाही.तरी या महिलेवर कारवाई करावी अशी विभागातील नागरिकांची मागणी आहे.