गडब/सुरेश म्हात्रे
🌑१९१ पेण विधानसभा मतदारसंघात शेकापक्षाकडून अतुल नंदकुमार म्हात्रे व शिवसेना उबाठा गटाकडून प्रसाद भोईर यांच्या उमेदवारीमुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे संजय म्हात्रे यांच्यासह सुरेश खैरे, नमिता नंदकुमार म्हात्रे, पल्लवी प्रसाद भोईर, दशरथ साळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु प्रसाद भोईर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) किंवा अतुल म्हात्रे (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे. १९१ पेण विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत रवींद्र दगडू पाटील (भाजपा) चिन्ह - कमळ, देवेन मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह - गॅस सिलेंडर, प्रसाद केळुराम भोईर (शिवसेना, उबाठा), चिन्ह - मशाल, अतुल नंदकुमार म्हात्रे (शेकाप), चिन्ह - शिट्टी, विश्वास मधुकर बागुल (अपक्ष), चिन्ह - इस्त्री, मंगल परशुराम पाटील (अभिनव भारत पार्टी), चिन्ह - माईक, अनुजा उर्फ अनु केशव साळवी (बहुजन समाज पार्टी), चिन्ह - हत्ती, हे सात उमेदवार रिंगणात आहेत.