Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार राहणार उपस्थित

Responsive Ad Here

गडब/अवंतिका म्हात्रे
लाडक्या बहिणींना हक्काचं माहेर... दरमहा मिळणार मानाचा आहेर... असा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम बुधवार, दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता माणगावजवळील मोर्बा रोड मार्गावरील निळगूण फाटा येथील अल्ताफदादा धनसे यांच्या भव्य मैदानावर होणार आहे. या कार्यक्रास राज्याचे
मुख्यामंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रायगड-रत्नागिरी मतदार संघाचे खा. सुनील तटकरे, मावळचे खा. श्रीरंग बारणे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ.प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. रवीशेठ
पाटील, आ. निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास महिलांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली आहे.
हा सोहळा माणगाव शहरापासून दिड किलोमीटर
अंतरावर असणाऱ्या दिघी-पुणे राज्य मार्गावरील मोर्बा
गावाजवळील निळगूण फाटा येथील अल्ताफदादा
धनसे यांच्या भव्य मैदानावर होणार आहे. या
कार्यक्रमाची जोरदार तयारी प्रशासनातर्फे तसेच
महायुतीच्या कार्यक्रत्यांकडून करण्यात आली आहे. या
कार्यक्रमास राज्याचे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित
पवार हे हेलीकॉप्टरने माणगावला येणार असल्याने
माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव परिसरात शासकीय विश्रामगृहा समोरील प्रशस्त
जागेत डांबरीकरण करून हेलिपॅड तयार करण्यात
आले आहे. तसेच माणगाव नगरीत व माणगाव मोर्बा
रोड मार्गावर जागोजागी मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचे बॅनर व महायुतीचे
झेंडे लावण्यात आले आहेत.
अनेक ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माणगाव या ठिकाणी होत असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.