गडब/अवंतिका म्हात्रे
महाराष्ट्र शासनाच्या
क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024-25 परभणी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती या आठ विभागातील कुस्तीपटूनी सहभाग घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले होते.
मुंबई विभागाचे नेतृत्व करताना रायगडच्या कु. क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. क्षितिजा ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाची महिला मल्ल असून राजाराम कुंभार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पालांडे, विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षासून कुस्तीचा सराव करत आहे. ती खोपोली येथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिला शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, समीर शिंदे, जयश्री नेमाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती केंद्रशासनाच्या स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या मुंबई येथील कुस्ती केंद्रात द्रोणाचार्य अवॉड विजेते राजसिंग चिकारा, अमोल यादव, शिल्पी नरशिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच शिकत आहे. राज्यस्तरीय पातळीवर केलेल्या सुवर्ण
कामगिरीनंतर क्षितिजाची गोरखपूर - उत्तर
प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
झाली आहे. सलग तीन वर्षे सुवर्णपदक
मिळवून इतिहास रचलेल्या क्षितिजाचे कॉन्व्हेंट
स्कूलच्या मॅनेजर सिस्टर मरिना,
मुख्याद्यापीका सिस्टर निर्मल मारिया, तालुका
कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील, कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार, जिल्हा
क्रीडाधिकारी राजेंद्र अतनूर, महाराष्ट्र राज्य
कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल
राऊत, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक
मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, किशोर पाटील,
यशवंत साबळे, दत्ताजीराव मसुरकर, कोयना
समाजाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि
अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे.