गडब/सुरेश म्हात्रे
पी एम श्री राजीप शाळा आमटेम येथे एसओएस संस्थेतर्फे शाळेला पाच संगणक, प्रिंटर,, वायफाय सुविधा, दोन पंखे, बारा खुर्च्या, कम्प्युटर ट्रॉली आणि, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बॅग, वह्या पेन त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना N I T मोफत प्रशिक्षण की जे प्रशिक्षण घेण्याकरता सात हजार रुपये मोजावे लागतात ते ते मोफत पीएम श्री शाळा आमटे म येथे मिळणार आहे.
याकरिता संगणक शिक्षिका सुद्धा एसओएस संस्थेने नेमली आहे हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला सर्टिफिकेट मिळणार आहे भविष्याची गरज ओळखून या संस्थेने आम्हाला भरीव असं दहा लाखापर्यंत योगदान दिलेले आहे त्यांचे स्वागत आमच्या आमटेंम च्या विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी इंग्रजी कन्नड गुजराती आणि बंगाली भाषेत करून पाहुण्यांचे मन जिंकले ही संस्था 135 देशात कार्यरत असून अनाथ मुले व महिला सशक्तिकरण करण्यासाठी काम करत आहे या आनंद दायी सोहळ्यासाठी एसओएस व पारिक फाउंडेशन तर्फे सन्मा. भाव्या शहा सर सी एस आर हेड, श्री महेश भट डायरेक्टर महाराष्ट्र, वाजपेयी सर, नीला मॅडम पठाण सर प्रोजेक्ट इन्चार्ज सर्व विद्यार्थी,, पालक शाळा व्यवस्थापन सदस्य केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय पाटील सर तसेच सखाराम पाटील, मोहन भोईर सर उपस्थित होते हा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता वावेकर, सुजाता म्हात्रे, हरिश्चंद्र मोकल, अनघा म्हात्रे, नंदिनी पाटील भाग्यश्री म्हात्रे, प्रतिभा कपाळे त्याचबरोबर एसओएस च्या कार्यकर्त्या अमिता, प्रतिभा, दिशा अमृता, हेमा संगणक शिक्षिका सुषमा यांनी मेहनत घेतली या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री महेंद्र पाटील सर यांनी केले