Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगडात वर्षभर हफ्ते, आचारसंहितेत कारवाई सुचते !

Responsive Ad Here



गडब/सरेश म्हात्रे

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एका दिवसातच एकूण १८ गुन्हे नोंदविण्यात आले असून १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये ५०६०.१२ लिटर दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये २ लाख ७१ हजार ४२५ आहे.
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक २०२४ आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रूम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुक २०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची सात पथके तैनात असून पथकांस आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य
वाहतूक होणार नाही, याकरिता रायगड जिल्ह्यातील शेडूंग, खारपाडा व चांदवे येथे २ तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे हॉटेल, टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे.
सर्व नागरिकांनी विधानसभा निवडणूक २०२४ मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरिता विधानसभा
मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉट्सअॅप क्र. ८४२२ ०० ११३३ व टोल फ्री क्र. १८०० २३३ ९९९९ व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२८००१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे.