पेण तालुक्यातील गडब येथील संस्कार शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी व मान्यवर सन्मान, स्मरणिका प्रकाशन, ढोलकीच्या तालावर फेम नेहा पाटील यांचे नुत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेकाप राज्य खजिनदार तथा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे, संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, माजी मुख्याध्यापक के. पी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक चिंतामण मोकल, डोलवी उपसरपंच रोहन म्हात्रे, सदस्य निलेश म्हात्रे, उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे पी.वाय. पाटील, गणेश तांडेल, राजेंद्र शेलार आदि मान्यवरासह सस्थेचे आजी माजी विद्यार्थी पालक नागरीक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आर्किटेक्ट अतुल म्हात्रे म्हणाले पेण शहरातील शाळेप्रमाणे गडब येथील या शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या प्रगती साठी मेहनत घेत असून या संस्थेची अशीच प्रगती होत राहील. तसेच ज्या ज्या वेळी माझी गरज लागेल तेव्हा मी सहकार्य करेन असे यावेळी आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
पेण तालुक्यातील ग्रामिण भागातील गरीब गरजु मुलांना दर्जेदार शिक्षण देवुन शैक्षणिक पाया मजबुत करणे व संस्कारक्षम नागरीक निर्माण करणे या उदात्त हेतुने संस्कार शिक्षण संस्था गडबची निर्मीती 1999 करण्यात आली. एका घरात शिशु वर्गापासुन सुरु झालेली ही शाळा आता संस्थेच्या स्वताच्या मालकीच्या प्रशस्त अद्यावत ईमारतीत सुरु आहे. या शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेवुन उच्च स्तरावर नोकरी व व्यवसाय करीत आहेत.
संस्कार शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या गडब संस्कार विद्यालयात सत्यनारायणांची महापुजा, महेंद्र पाटील कळवे यांचे भजन, मान्यवरांचा सन्मान माजी विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान, स्मरणिका प्रकाशन, ढोलकीच्या तालावर विजेती नेहा पाटील यांचे नुत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांचे नुत्य, माजी विद्यार्थाचे नुत्य, आदिवासी मुलींचे नृत्य, शालेय पालकांचे नृत्य, निमत्रीत समुह नुत्य
..सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री संजय रघुनाथ चवरकर, प्रथमेश मोकल (उपाध्यक्ष ) संदीप म्हात्रे (सचिव) दिनेश म्हात्रे (सहसचिव) विश्वनाथ पाटील (खजिनदार) महेंद्र पाटील सदस्य, अजित कोठेकर सदस्य, प्रभावती मोकल सदस्य, सौ विजया पाटील सदस्य, चिंतामणी मोकल (मुख्याध्यापक) श्री मनोज लोभी विभाग प्रमुख शाळा सुंदर, स्वप्नाच्या पाटील सहा शिक्षिका सचिन तेलंगे शिक्षक, अस्मिता मोकलआदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.