गडब/सुरेश म्हात्रे
विधानसभा निवडणुकीक्या पार्श्भूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षाच्या अनेक शिलेदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील "मोदी बाग" या निवास्थानी भेट घेतली.जुन्नर चे आमदार अतुल बेनके, भोसरीचे माजी आदर विलास लांडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर,भाजप नेते पृथ्वीराज जाचक यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रमुख प्रभक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्या कोणत्या शिलेदारांना पक्षात घेऊन,शरद पवार त्यांना धक्का देणार याबाबत ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर ग्रामीणचे भाजप नेते समरजित सिंह घाडगे,इंदापूर चे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.यांचा समावेश आहे. याशिवाय अजित पवार यांचे समर्थक रामराजे निंबाळकर हे ही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे .त्यातच जिल्ह्यातील अनेक जण शरद पवार यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.