जीवन सुंदर आहे हसत खेळत जगावं
जगताना कधीतरी मागे वळून बघावं
गेले ते दिवस गेल्या त्या यातना
आता फक्त राहिल्या सुखाच्या भावना
जन्म आणि मृत्यू यातील अंतर हे आयुष्य
जगणं किती आहे,ज्यांन घडवलं त्यालाच कळत
नशिबाची साथ असेल तर सर्व काही मिळत
आळस पणां केला हातात असलेलं गमव त
माणसानं माणसाशी माणसा प्रमाणे वागावं
पशु पक्षी गुणवंत त्यांच्या कडून शिकाव .
सायली संजय शहा
संस्कार विद्यालय गडब शिक्षीका
पेण - रायगड