Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️जे. एस. डब्ल्यू कंपनी विरोधात ग्रामपंचायत काराव च्या सरपंच सदस्यांचे उपोषण स्थगित♦️♦️

Responsive Ad Here
 ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
   पेण तालुक्यातील  ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना स्थानिक जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने नोकरीत सामावून  घ्यावे आदि मागण्यासाठी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या कारावी येथील गेट समोर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी आमरण उपोषणास ईशारा दिला होता. 
     या उपोषणाच्या अनुषंगाने पेण तहसिदारांनी जेएसडब्लु कंपणी व्यवस्थापनाला काराव ग्रामपंयती सोबत उपोषणकर्तासोबत चर्चा करुन त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर कार्यवाही करावी व उपोषणापासुन परावुत्त करावे असे सुचित केल्यावर जे.एस.डब्लु कंपणी व्यवस्थापनाने  ग्रामपंचायतीचे सरपंच  मानसी  पाटील व सदस्य यांचे सोबत चर्चा करण्यात आली व या चर्चेमधे आॅक्टोबंर 2024 मधे भरती प्रकक्रीया सुरु होणार या भरती प्रक्रीयेमधे पंचायतीच्या पात्र उमेदवाराना प्राधान्य दिले जाईल असे अश्वासित केल्याने काराव ग्रामपंचायतीचे सरपंच व यांनी पुकारलेले जे.एस.डब्लु गेटसमोरील उपोषण तुर्त स्थगित करत आसल्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांनी सांगितले.