Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

कंपनीच्या औद्योगिक कारणामुळे तरुणांना वेगवेगळे आजार निर्माण होत असतात .ते घालवण्यासाठी तरुणांनी व्यायाम शाळेचा उपयोग करावा.(मा.मंत्री रविशेठ पाटील).

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

पेण तालक्यातील डोलवी येथील अद्यावत व्यायाम शाळेचा उद् घाटन समारंभ माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला .यावेळी आपल्या उद्घटनिय भाषणात पाटील बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत सुधीर तैलाँग (एचओडी- सी एसआर विभाग जे.एस.डब्ल्यू) ,वैकुंठ शेठ पाटील(युवानेते), प्रभाकर म्हात्रे(माजी जिल्हा परिषद सदस्य), अनिल शेठ म्हात्रे (समाजसेवक), सुरेश बालाजी म्हात्रे,प्रमोद म्हात्रे(सामाजिक कार्यकर्ते) व परशुराम शेठ म्हात्रे (सरपंच डोलवी) आदी उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जांभळे सर यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन परशुराम म्हात्रे डोलवी यांनी मांडले.
        सदर कार्यक्रमाला प्रमोद म्हात्रे,देविदास म्हात्रे, राजेश मोकल,प्रशांत म्हात्रे, मधुकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे सह अनेक डोलवी ग्रामास्त उपस्थित होते.