गडब/सुरेश म्हात्रे
🌍पेण तालुक्यातील कासू, वडखळ आणि पाबल विभागात ज्यादा पैशाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर केस ची फाईल पेण तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली होती. सदर केसच्या तारखे संदर्भात सौ.शशिकला पद्माकर मढवी हिने पेण तहसीलदारांकडे जामीन दिला होता,मात्र सदर के संदर्भात सदर महिला तारखेला हजर राहत नव्हती. ही बाब फिर्यादी महिलेने पेण तहसीलदारांकडे चौकशी केली असता सदर महिला तारखेला हजर राहत नाही हे लक्षात आले. सदर जामीनात (सौ.शशिकला पद्माकर मढवी - रा गडब हिने ) जामीनदार ( उल्हास गोपाळ म्हात्रे ) या व्यक्तीचे खोटे कागदपत्र सादर केले होते. यासंदर्भात नायब तहसीलदार परदेशी यांना विचारणा केली असता, हा भ्रष्टाचार उघडकीस आला. सदर महिलेला हजर करण्यासाठी नायब तहसीलदार यांनी, पेण तहसील कार्यालयात चौकशी केली असता, तब्बल तीन महिन्यांनी एका ओळखीच्या माणसाला जामीन म्हणून हजर केले.
यासंदर्भात फिर्यादी महिलेने वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना सविस्तर वृत्तांत ऐकवला. प्रसाद पांढरे यांनी सदर महिलेला पन्नास हजाराच्या बॉण्ड पेपरवर सोडण्याचे हुकूम दिले. अशा तऱ्हेने सदर महिला लोकांची दिशाभूल करून पैसे उकळून नेहमीच पोबारा करीत असते. पेण तहसिल कार्यालयात सुळसुळाट झाला असून सदर कचेरी कोर्ट ) वरिल लोकांचाविश्वास उडू लागला आहे .