Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश.♦️

Responsive Ad Here
✍🏻गडब/सुरेश म्हात्रे✍🏻

पेण तालुक्यातील गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन्चार्ज अपर्णा वर्तक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते . सदर निवेदन प्रवासी "रजादिन" याचे अवचित्य साधून सदर निवेदन गडब गावातील पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला अध्यक्षा सौ. अवंतिका सुरेश म्हात्रे व रायगडची शानचे संपादक,पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी पेण विभाग नियंत्रक यांना देण्यात आले होते .
    सदर निवेदनात पेण तालुक्यातील गडब गावातील कामगार वर्ग व विद्यार्थी व इतर प्रवासी वर्ग यांना समस्या भेडसावत होती. त्यामुळे लोकांची गैरसोय लक्षात घेता हे निवेदन सौ . म्हात्रे यांनी दिले होते . 
यासंदर्भात पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व अपर्णा वर्तक यांच्याशी गेली दोन महिने अर्जाचा पाठपुरावा केला व वेळोवेळी स्वतः भेटून व दुरध्वनीवरून संपर्क साधला असता अखेर विभाग नियंत्रकांनी अर्जाची दखल घेत सदर समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जातील व प्रवास्यांचे समाधान होईल असे म्हात्रे यांच्याशी वेळोवेळी बोलताना सांगीतले . त्या अनुषंघाने गडब गावाठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्या संदर्भातील फलक पेण तालुका राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ अवंतिका म्हात्रे व सुरेश म्हात्रे यांना फलक सुपुर्द करण्यात आले .
सध्या गडब येथील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याने लवकरच हे नामफलक त्यावण्यात येणार असल्याचे सौ म्हात्रे यांनी सांगीतले.