*गडब/अवंतिका म्हात्रे*
पेण तालुक्यातील शहरी, तसेच सर्व ग्रामीण भागात दीड दिवसांच्या गणपतींना गणेशभक्तांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला. पेण शहर आणि तालुक्यात सुमारे ४८० दीड दिवसीय गणराज विराजमान झाले होते. विसर्जनानिमित्ताने तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या नदीकाठांवर, तलावांवर, तसेच ओढ्यांवर गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पेण तालुका हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वसलेला आहे. पेणमध्ये दुपारी ३ वाजल्या पासूनच गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली. पावसाने आज चांगली उघडीप घेतल्याने विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी पावसाचे विघ्न आले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खालू बाजासह मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. तसेच काहींनी भजनांच्या मिरवणुकीत बापाचे जवलोषात विसर्जन करण्यात आले बाप्पाचे संपूर्ण तालुक्यात दुपार ते संध्याकाळ उशिरापर्यंत दीड दिवसीय गणरायाचे विसर्जन सुरू होते गडब येथील मोठे तलाव तसेच देवकीचा तलाव येथे गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच गडब येथील मोठे तलाव येथे विसर्जन घाटावर रेल्वे ट्रॅक असल्याने वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदशना खाली योग्यतो पोलीस भूमिका बजावतांना दिसत होते. अशा प्रकारे गडब येथे दीड दिवसांच्या गणरायांचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार
पडला.