✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे*
◼️वडखळ पोलीस स्टेशन आणि पेण तालुक्यातील पत्रकार यांच्यातील सुसंवाद बैठकीचे आयोजन वडखळ येथे करण्यात आले होते सदर बैठकीत पत्रकारांचे उद्धीष्ट व प्रशासन वृद्धींगत करणे .तसेच परस्पर सुसंवादातुन अधिक चांगले आणि परिणामकारक मार्ग शोधणे .
या बैठकीला वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे , पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण धारकार , विजय म्हात्रे , पोलीस निरीक्षक दत्तात्रेय देवकाते पोलीस हवालदार अमोल म्हात्रे , पोलीस शिपाई आकाश व स्थानिक पत्रकार उपस्थित होते .यावेळी पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषीवरचे पत्रकार संतोष पाटील यांनी आपल्या क्षेत्रातील समस्यांचा उल्लेख करताना पोलिसांकडून अधिक पारदर्शकता आणि वेळेवर माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली तर पत्रकार राजेश कांबळे यांनी सांगितले की योग्य आणि स्पष्ट संवादामुळे समाजात घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचत मदत होईल तसेच दत्ता म्हात्रे यांनी पोलीस प्रशासनाचे त्यांच्या काम करताना भेडसावणाऱ्या समस्या यावर प्रकाश टाकला .
सदर बैठकीदरम्यान पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय कसा अधिक चांगला होऊ शकतो यावर चर्चा करण्यात आली एकमेकांच्या भूमिकेचा आदर करीत पोलिस आणि पत्रकार यांनी एकत्र काम करून समाजासाठी सर्वोत्तम सेवा पुरवावी .सदर बैठकीचा समारोप करताना पोलीस निरीक्षक पांढरे यांनी पत्रकार हे समाजाचा चौथा स्तंभ असून त्यांच्यामुळे एखाद्या घटनेचा उलघडा होतो .त्यामुळे पोलीस प्रशासन यांच्याशी सदैव सुसंवाद साधुन समाजाच्या हितासाठी एकत्रिक राहील तसेच पोलीस आणि पत्रकार या दोघांच्या भुमिका ह्या नाण्याच्या दोन बाजु असल्याचे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे म्हणाले. तसेच समाजातील वातावरण सुस्थीतीत आणण्याचे काम हे पोलीस आणि पत्रकार हे करतात तसेच आज असनाऱ्या माहिती अधिकार दिनाविषयी गोर गरीब लोकांना न्याय मिळत असल्याचे सांगीतले तर समाज हिताचे काम ह्या माहीती आधिकार कायदयातुन केले जात असल्याचे ते म्हणाल .
पत्रकारांच्या वतीने अनिस मणियार यांनी सर्वांचे आभार मानले .
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नीटनेटके करण्यात आले होते भविष्यात देखील अशा संवाद बैठकीचे आयोजन करून दोन्ही क्षेत्रामधील संबंध आणखीन मजबूत करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले . यावेळी वडखळ पोलिसांतर्फे पत्रकारांना भेटवस्तू देण्यात आल्या .