*गडब/अवंतिका म्हात्रे*
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे तटकरे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र तसेच रायगडसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
देशातील सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस क्षेत्रात सुनिल तटकरे यांना सन्मानाचे पद मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला गेला आहे. या क्षेत्राचा दरवर्षी ३ ते ५ टक्के वृध्दीदर असून, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील ३१ खासदारांचा समावेश असलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी तटकरे यांची निवड झाल्याने, महाराष्ट्राच्या विकासासाठी हा एक मोठा मान समजला जात आहे.