Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️ युतीत तालुका पातळीवर अजूनही मनं जुळलेली नाहीत; तटकरेंची स्पष्ट कबुली♦️

Responsive Ad Here


 
    
गडब/अवंतिका म्हात्रे
विधानसभा निडणुकीच्या तोंडावर सुनिल तटकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगले सुसंवाद आहे. समन्वय ही आहे, असे सुनिल तटकरे म्हणाले आहेत पण जिल्हा आणि तालुका पातळीवर सुसंवाद नाही याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजप बरोबर पहिल्यांदाच युती केली आहेत. पण कार्यकर्त्यांची मने काही जुळलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद होताना दिसत असल्याचे ते म्हणाले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सतत शिवसेना आणि
भाजप बरोबर संघर्ष केला आहे. त्यात स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आघाडीवर होते. यावेळी आम्ही युतीत
आहोत. असं असलं तरी तालुका आणि
जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांची मनं
काही जुळलेली नाहीत हे सत्य आहे.
ज्यांच्या बरोबर संघर्ष केला त्यांच्या
बरोबर जुळवून घेण्यात अडचणी येत
आहेत. त्यातूनच काही जण काही
वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पण
आपण त्याकडे लक्ष देत नाही असे ङ्ग
खासदार सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र नेत्यांच्या आणि पक्षाच्या
पातळीवर महायुतीत चांगला समन्वय
असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले. त्याला महत्वाचं कारण होतं ते म्हणजे समन्वयाचा आभाव. समन्वय नसल्यामुळे आम्हाला पराभव स्विकाराला लागला असेही तटकरे 3 यावेळी म्हणाले. पण लोकसभे प्रमाणे आता स्थिती नाही. विधानसभेला महायुतीला आणि घड्याळाशिवाय पर्याय नाही. जागा वाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. लवकरच जागा वाटप जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा ही त्यांनी समाचार घेतला. 

*⚫टाइम्स स्पेशल⚪*

राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी रांग लागली आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. रांग लागली आहे तर घ्या, असे प्रत्युत्तर तटकरे यांनी दिले आहे. जयंत पाटील यांना असे बोलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते बोलत आहेत. त्यांनाही माहित आहे की आता सहानुभूती मिळणार नाही. लोकसभेला जे झाले ते विधानसभेला होणार नाही, असेही तटकरेंनी स्पष्ट केले. केंद्रातलं सरकार विधानसभेनंतर कोसळणार, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हण यांनी केले होते. त्याचाही समाचार तटकरे यांनी घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं, असा हल्लाबोल त्यांनी केला. शिवाय चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी चव्हाणांच्या कानात सांगितलं का की ते पाठिंबा काढणार आहेत? असा सवालही त्यांनी केला. चव्हाण यांनी एनडीएवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या मतदार संघात पक्षात काय चाललं आहे त्याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.