✍🏻गडब/ अवंतिका म्हात्रे
⬛ सालाबाद प्रमाणे यावर्षी दत्ता कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित लावली त्यामध्ये पत्रकार पोलीस आणि डीके यांचा वक्रतुंड मित्रमंडळ, व मित्रपरिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजीराव फडतरे, पेण पोलीस निरीक्षक - संदीप बागुल दत्ता कांबळे यांची आई साधना कांबळे पत्नी राजश्री कांबळे सार्वजनिक विद्यालय मंदिर पेणचे प्राचार्य एस. एच नाईक उपप्राचार्य आर . आर . पाटील ,पत्रकार व दत्ता कांबळे यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की दत्ता कांबळे सारखा समाजसेवक मी केव्हा पाहिलेला नाही. त्याने प्रतिकूल परिस्थितीत खडतर जीवन जगत गरिबीवर मात केली. त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली कोरोना काळात विविध लोकांना मदत केली. जाहे शाळेला वॉटर फील्टर, कुलर ची भेट तसेच पोलीस व पेण पत्रकार यांना पाच लाखाचा इन्शुरन्स वाटप ,सार्वजनिक विद्यामंदिर पेण शाळेस स्पोर्टस साहित्य भेट . यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व दत्ता कांबळे यांच्या जीवनाचा गौरव केला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार तथा दत्ता कांबळेचे परममित्र देवा पेरवी यांनी केले