✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरलेल्या महिला वर्गाने आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे. ज्या महिला वर्गाचे बँक खात्याशी आधार लिंक नसेल त्यांनी तात्काळ आपल्या खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य प्रा. माणिक विधाते यांनी केले आहे.
राज्य सरकारने 28 जून रोजी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना 31 ऑगस्ट पर्यन्त अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या महिला भगिनींनी अर्ज दाखल केलेले असतील व ज्या भगिनी अर्ज दाखल करत असतील त्यांनी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे व 2 फोटोसह बिनचुक माहिती भरावी. आपले आधारकार्ड बॅक खात्याशी लिंक करून घ्यावे. ज्या महिलांनी अर्ज भरले आहे, मात्र त्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. बँकेचे खाते आधारशी लिंक असलेल्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, तर तांत्रीक अडचण निर्माण होऊन अर्ज भरला जाणार नसल्याचे प्रा. विधाते यांनी स्पष्ट केले आहे.
▪️शहरातील सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या भागातील महिला भगिनींची अर्ज अचुक भरण्यासाठी आणि जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. अपूर्ण माहिती व चूकीचे अर्ज पोर्टलवर स्विकारले जाणार नसून, याची देखील महिला भगिनींनी नोंद घ्यावी. -प्रा. माणिक विधाते (सदस्य, लाडकी बहीण योजना समिती)