✍🏻गडब/अवांतिका म्हात्रे*
.रायगड जिल्हयात सध्या
युरिआ खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या अडचणीबाबत प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी अॅड. प्रविण ठाकूर यांनी शासनाला व आर.सी.एफ.ला तातडीने पत्र लिहून या परिस्थितीमधून तात्काळ मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
मागील काही महिन्यांपासून या परिस्थीतीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हा प्रत्यय येत आहे. जिल्हा कृषी विभागासोबतच आरसीएफ कंपनीची उदासिनता टीकेचा विषय बनला आहे.
रायगड जिल्हयात मागील खरिपातील भात पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मात्र जिल्हयात मागील काही दिवसांपासून खत विक्रेत्यांकडे युरिआ खताचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. रायगड जिल्हा राज्यात भाताचे कोठार म्हणून ओळखळा जातो. सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र ऐन हंगामात शेतकऱ्यांना खताच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तरी याबाबत आपण सविस्तर आढावा घेवून युरिआ खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांच्ऱ्या होणाऱ्या नुकसानीबाबत मार्ग काढावा अशी विनंती प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी अॅड. प्रविण ठाकूर यांनी केली आहे.