गडब/सुरेश म्हात्रे
गेली १७ वर्षे रखडलेला मुंबई-
गोवा महामार्ग अद्याप अपूर्णच अवस्थेत आहे. रायगड जिल्ह्यातला बहुतांश भाग हा अर्धवट स्थितीतच असल्याचे पाहायला मिळत आहे. नागोठणे पासून पुढे १ ते २ किलोमीटर, कोलाडपासून मागे काही अंतर आणि लोणेरे पासून वीर पर्यंत खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य आहे. इंदापूर आणि माणगांवचा बायपास रोड, कोलाड लोणेरे येथील उड्डाण पुलासह आणखी छोटी मोठी अनेक
कामे अर्धवट असल्याने याही वर्षी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
गेली १७ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून गेल्या १० वर्षात या महामार्गा साठी ६ हजारकोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
त्यानंतरही महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असून जी कामे पुर्ण झालेली आहेत त्या कामातही आता तुटफूट होण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी पाहणी दौरे करून कोकणवासियां ची समजूत काढत आहेत.
गणेशोत्सवापुर्वी खड्डे बुजवून हा मार्ग तात्पुरता दुरुस्त केला जात असतो. आत्ता पर्यत महामार्गाच्या दुरुस्ती साठी १९२ कोटी खर्च करण्यात आले आहेत.
गतवर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री
रविंद्र चव्हाण यांनी चार ते पाच वेळा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर डिसेंबर २०२३ अखेर महामार्गाचे काम पुर्ण होईल असे ओशासन दिले होते मात्र यावर्षी ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर महामार्गाची वडखळ ते वीर पर्यंतची अवस्था पाहता डिसेंबर २०२४ अखेरही हे काम पुर्ण होणार नाही हे स्पष्ट होत आहे. वीर ते लोणेरे, इंदापूर ते कोलाड आणि नागोठणे ते गडब दरम्यान महामार्गाचे काम अपूर्ण असून सर्व्हस रोडवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. हे पाहता यावर्षी गणेशोत्सवात मोठी वाहतुक कोंडी होणार असून कोकणातील गणेश भक्तांना गचके खातच प्रवास करावा लागणार आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सतरा अठरा वर्षात पूर्ण करु शकले नसल्याबद्दल रायगड प्रेस लबच्यावतीने खेद व्यक्त करीत देशातील
काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करून
गिनिज बुक सारख्या विक्रमांची नोंद
करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग
प्राधिकरणाने जगातील सर्वाधिक
काळ रखडलेला महामार्ग म्हणून
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची नोंद
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
करण्यासाठी देखील तेवढीच तत्परता
दाखवावी अशी मागणी केली आहे.
माणगांव शहरात अरुंद रस्त्यामुळे
होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
माणगांव शहराबाहेरून काढण्यात
यावयाचा बायपास मार्ग देखील
रखडला आहे. त्यामुळे माणगांव येथे
होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
आहे. यावर्षी खांब येथील उड्डाण
पुलाची संरक्षकभिंत कोसळली.
ठिकठिकाणी काँक्रीट रस्त्याला भेगा
ठिकठिकाणी काँक्रीट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या कामात कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता राखली गेलेली नाही हे याचे निदर्शक आहे.