✍️गडब / अवंतिका म्हात्रे
पवित्र श्रावण महिन्यात खास महिलांकरिता त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अजितपवार गट राष्ट्रवादी काँग्रेस महिलाआघाडी पेन तालुका व पेण शहर यांच्यावतीने "श्रावणसरी " नृत्य स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे .
सदर स्पर्धेसाठी बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेचजिल्हाध्यक्ष मधुकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष व उमा मुंडे रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचीउपस्थिती असणार आहे
सदर स्पर्धा रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी आगरी समाज हॉल पेण येथे ठीक तीन वाजता सुरू होतील प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक भेटवस्तू असणार आहे
*स्पर्धेचे नियम व अटी :-*
1 ) एका ग्रुपमध्ये कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 15 स्पर्धक महिला असाव्यात.
2 ) प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल.
3 )नृत्यासाठी लागणारे वाद्यवृंद व इतर साहित्य हे स्पर्धकांनी स्वतःहा आणावेत.
4 )एक स्पर्धक एकाच वेळी एका ग्रुप मध्ये भाग घेऊ शकतो.
५ ) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
*सदर स्पर्ध्येचे बक्षीसाचे स्वरूप*
♦️प्रथम क्रमांक
१०,०००/- व सन्मानचिन्ह
♦️द्वितीय क्रमांक
७०००/- व सन्मानचिन्ह
♦️तृतीय क्रमांक ५०००/- व सन्मानचिन्ह
♦️उत्तेजनार्थ १ व २ प्रत्येकी ३०००/- व सन्मानचिन्ह असे बक्षीसाचे स्वरूप असणार आहे
सदरस्पर्धेसाठी संपर्क
१ )सुनिता घरत -9271727154
२ )तृप्ती मात्रे .9860836147
3 )अवंतिका म्हात्रे
7821917164
४ )तनुजा आवास्कर
8623936506
५ )स्वाती म्हामुणकर
9021381305
६ )मुस्कान झटाम
913029088 8
७ ) रजनी भोईर
97307992111
सदर स्पर्धेचे नियोजन विधानसभा अध्यक्ष वसुधाताई पाटील , जिल्हा उपाध्यक्ष शालन सावंत तालुका अध्यक्ष चैताली पाटील, शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे, सुनीता घरत जयश्री पाटील, जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील, शहर युवती अध्यक्ष मुस्कान झटाम, स्वाती म्हामणकर तनुजा आवास्कर तृप्ती म्हात्रे रजनी भोईर यांच्या विशेष प्रयत्नाने होणार आहे . सदर स्पर्धेतजास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमास रंगत आणावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे