Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

१४ रेल्वे गाड्यांना पेण, झारापला अतिरिक्त थांबे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचा निर्णयखासदार- सुनील तटकरे यांच्या मागणीला यश

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

⬛गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक गाड्यांचे आरक्षणही सुरू झाले आहे. यापैकी १४ विशेष गाड्यांना पेण आणि झाराप स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे यावर्षीही विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवणार आहे.
मुंबई - रोहा, मुंबई - पेण, मुंबई - चिपळूण, मुंबई - नागोठणे या सुनील तटकरे यांच्या मंत्र्यांकडे केलेल्या मागणीला यश आले आहे. सीएसएमटी-सावंतवाडी रोड (०११५१), सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी (०११५२) तसेच मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड (०९००९) आणि सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल (०९०१०) या चार गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबा दिला आहे. तसेच, मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी (०११५३) आणि रत्नागिरी
कोणकोणत्या गाड्यांमध्ये बदल ?
रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी (०११५४) आणि कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनल (०११६८) या दोन विशेष गाड्यांच्या सुटण्याची तारीख बदलली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार या गाड्या २ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावतील, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

- मुंबई सीएसएमटी (०११५४), लोकमान्य टिळक टर्मिनल- कुडाळ (०११६७), कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनल (०११६८), लोकमान्य टिळक टर्मिनल कुडाळ (०११८५), कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनल (०११८६), लोकमान्य टिळक टर्मिनल-कुडाळ (०११६५), कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनल (०११६६) या गाड्यांना पेण स्थानकावर थांबा दिला आहे.