✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील सर्व नागरिक, विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी/ कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी तसेच पत्रकार बंधू यांना आवाहन करण्यात येत आहे, की यावर्षीचा भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट 2024 हा *तहसील कार्यालय पेण या ऐवजी मा. उपविभागीय अधिकारी पेण* यांचे प्रांगणात संपन्न होणार आहे. तहसील कार्यालयात जागेचा अभाव तसेच वाहतुकीची होणारी कोंडी व पूर्वतयारीबाबत अडचणी निर्माण होत असतात. तसेच पेण तालुक्यात मा.उपविभागीय कार्यालयाची स्थापना झाल्याने तालुक्याचे मुख्य कार्यालय हे तेच आहे. तसेच तेथे जागेची अडचण उद्भवणार नाही व वाहतूक व्यवस्था देखील सुरळीतपणे व नियोजनबद्ध येईल .त्या दृष्टीने या पुढील ध्वजारोहणाचे सर्व मुख्य शासकीय समारंभ हे मा.उपविभागीय अधिकारी पेण यांचे कार्यालयाचे प्रांगणात संपन्न होणार आहेत .त्या दृष्टीने सर्व पत्रकार बंधू यांनी आपल्या मार्फत देखील सर्व नागरिकांना आपल्या वर्तमानपत्रात यथोचित प्रसिद्ध देऊन अवगत करावे. सर्वांनी मुख्य ध्वजारोहणास 15 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तानाजी शेजाळ तहसीलदार पेण