Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

वडखळ पोलीस ठाणे अंतर्गत महिला गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी निर्भया पथक कार्यरत!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाणे अंतर्गत महिला गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी निर्भया पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे सर्व अधिकार पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या कडे देण्यात आले आहे. सदर निर्भया पथकामध्ये मपोसई/श्रीमती योगिता सांगळे ,मपोह/ 54 रेखा कांबळे, मपोह/77 गीता धुपकर , मपोह/68 सुषमा पाटील., मपोह/ 98 योगिता पाटील ,मपोह/ 106 दिपाली शिंदे., मपोह/137 स्नेहा पाटील ,मपोह/ 86 अतीक्षा गायकवाड.,मपोना /249 मयुरी मुंबईकर, मपोशी/ 609 संजीवनी पाटील, मपो शी/ 610 अंजली कुथे ,मपोशी /274 सोनल पाटील यांचे अधिकारी व महिला पोलिस अंमलदार पथक स्थापित करण्यात आले आहे.

सदर पथक पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वात कार्यरत करण्यात आले. सदर पथक 10 ते 12 व सायंकाळ17:00 ते 19.00 दरम्यान कार्यरत करण्यात आली. हे पथक वडखळ पोलीस ठाणे हद्दीत तुझं गुन्हे होणे महिला विरुद्ध गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळा कॉलेज, एसटी स्टँड, बँका, ज्वेलर, मार्केट, डेली बाजार, परिसरात महिला पोलीस अधिकारी PSI सांगळे मॅडम यांच्यासह महिला पोलीस आमदार व पोलीस वाहनासह प्रभावी ग्रस्त करणार आहेत. अशा ठिकाणी महिलांची छेड काढणे जाणार नाही. चैन स्नॅचींग होणार नाही, रोड रोमिओ गिरी केली जाणार नाही. याबाबत दक्षता घेतली जाणार आहे. व महिला सुरक्षा प्रधान केली जाणार आहे. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्वरित कडक कारवाई केली जाणार आहे. यामुळे शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलींच्या आई-वडिलांनी वडखल पोलिसांचे आभार मानले पोलीस या विजीबल पॉलिसी बद्दल समाधान व्यक्त केले सर्वसामाजिक राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ओळखल पोलिसांना धन्यवाद दिले.