गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील तहसील कार्यालय पेण मध्ये एका केस संदर्भात पेण तहसील कार्यालयात सौ.शशिकला पद्माकर मढवी रा गडब पेण हिच्या विरोधात गावातीलच एका महिलेने अदाखल पात्र गुन्हादाखल केला होता.त्या संदर्भात गडब येथील पत्रकार सुरेश म्हात्रे हे पेण तहसील कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले असता सदर आरोपी महिलेला दिलेल्या तारखेनुसार तहसील कार्यालयात फिरकलीच नाही. केवळ दोन तारखांनाच हजार राहिली.
या संदर्भात तहसील कार्यालयातील देवरूख
यांच्याकडे चौकशी केली असता त्या महिलेने जामीन दिला आहे असे सांगण्यात आले.त्यानंतर पत्रकार म्हात्रे यांनी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांची भेट घेतली असता सर्व हकीकत उघडकीस आली.आरोपी सौ.शशिकला पद्माकर मढवी यांना जामीन राहिलेल्या उल्हास गोपाळ म्हात्रे याने २०२०-२१ चा असेसमेंट उतारा जोडला असल्याचे समजले.त्यानंतर प्रसाद कालेकर यांनी उत्तर देण्याचे टाळले. एका खासगी दलाला मार्फत सरकारची मोठी फसवणूक केल्याचे पत्रकार म्हात्रे यांनी लक्षात देऊनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थ ठरले.
पेण तहसील कार्यालयात अश्या खासगी दलालांमार्फत जनतेची फसवणूक होत असताना त्यावर सरकारी अधिकारी काहीही उत्तर द्यायला तयार नाहीत.सदर प्रकरणाबाबत अधिकारी पेण यांना समक्ष भेटून सदर प्रकरणाची प्रस्तुत वार्ताहर सखोल चौकशी करणार आहेत .