गडब/सुरेश म्हात्रे
⬛सेंट्रल स्कूल आमटेम येथे,, अतिशय आनंदाचा दिवस आरोहा गिविंग विंग्स असोसिएशन आणि विज्ञान मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ,विज्ञान खेळणी व विज्ञान प्रयोग हा कार्यक्रम खूप भव्य दिव्य अशा प्रमाणात सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालू होता हा कार्यक्रम दोन सत्रात घेतला गेला भविष्यात मुलाला मूलभूत शिक्षण समाजात चांगले स्थान ,मुलांचे चांगले पालन पोषण ,त्यांचे संरक्षण त्यांना प्रगत होण्यासाठी आवश्यक अशी संधी देणे ,त्यामुळे उज्वल भविष्य निर्माण केले जाईल असं उद्दिष्ट होतं तर त्यांचं ध्येय होतं समाजातील सर्व घटकातील मुलांना योग्य शिक्षण मिळेल त्यांच्या चेहऱ्यावर हसू उठून चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतील ,अशी समाज प्रणाली तयार करण्यास हातभार लागेल असं ध्येय होतं
या कार्यक्रमाकरिता डॉक्टर किशोर कुलकर्णी विभाग अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई ,प्रोफेसर वर्गीज मृणालिनी साठे ,सल्लागार मराठी विज्ञान परिषद सन्माननीय लक्ष्मण तांबोळी चारुशीला जुईकर विज्ञान विभाग प्रमुख ,अनघा वक्ते विज्ञान विभाग, अधिकारी ,एसएमसी अध्यक्ष जनार्दन तांबोळी ,अजय देवकर शिक्षण कार्यवाह मराठी विज्ञान परिषद ,आमचे शिक्षक मुख्याध्यापिका अनिता वाडेकर,सुजाता म्हात्रे ,अनघा म्हात्रे, हरीश मोकल ,नंदिनी पाटील भाग्यश्री म्हात्रे ,प्रतिभा कपाळे ,महेंद्र पाटील त्याचबरोबर अरोहा संस्थेचे अजय दिवेकर ,रोहित राणे ,प्रतीका सिंग रावत, विनीत तांडेल, नितेश म्हात्रे, अशाप्रकारे सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम खूप सुंदर असा पार पडला विज्ञान खेळणी मध्ये तरंगणारा चेंडू, गोटी आणि स्ट्रॉ सुरमई डबी, सुतार पक्षी ,वर चढणारे फुलपाखरू ,हवाई भवरा,, न्यूटनची रंग चक्ती ,दृष्टी भ्रम निर्माण करणारा चेंडू ,अशा प्रकार विविध विज्ञानाची खेळणी तयार करण्यात आली ,180 विद्यार्थ्यांना विज्ञान किट वाटप करण्यात आले
, विज्ञान प्रयोगामध्ये दिशा बदलणारा बाण, पाण्यात तुटलेली स्ट्रॉ पाण्यात जळणारी मेणबत्ती, तळव्याला पडलेले छिद्र , पाण्याचे भिंग, बाटलीतले भिंगांचे प्रकार त्यानंतर पाण्यात तुटलेली पेन्सिल, अदृश्य होणारे नाणे ,चांदीची परीक्षा नळी ,पिशवीतले फुलपाखरू ,आवाज करणाऱ्या चमचा किंवा पट्टी, ध्वनीचे वहन हवेतून आणि मेगा फोन, धातू आणि हवेतून ध्वनीचे प्रसारण,
जडत्वाचेप्रयोग वर चढणाऱ्या ब्रश नाणे
आणि किंवा ग्लासात पडणारा पडणारे नाणे, फुग्यामध्ये फिरणारी गोटि जडत्वावरचे प्रयोग आहेत तरंगणारा
बटाटा आणि बुडणारा बटाटा पाण्यात घनतेवर आधारित प्रयोग होते अशा प्रकारे संपूर्ण दिवस विज्ञान खेळणी आणि विज्ञान प्रयोग यामध्ये गेला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील सर यांनी केलं.