✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समजल्यानंतर, गडब येथील लाडक्या बहिणीनी बँकेत गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. चाचपणीसाठी काही नेमक्याच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. मात्र आजपासून (शनिवार १७ ऑगस्ट) अधिकृतपणे सरकारकडून ही योजना सुरु होणार आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या घोषणेला जुमला समजणार्यांची अर्ज भरण्यासाठी धावाधाव उडाली आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. रक्षा बंधनच्या आधीच ओवाळणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पुणे येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. तर राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. रायगड जिल्ह्यातून सव्वा तीन लाख अर्ज वैध ठरले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये १५ ऑगस्टलाच प्रायगिक तत्वावर दोन हप्ते म्हणजे ३ हजार रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे दुसर्या दिवसी १६ ऑगस्टला गडब येथील बँक ऑफ इंडीयामध्ये महिलांची गर्दी दिसून आली. काही आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का ? याचीही चौकशी करताना दिसत होत्या. लाडक्या बहिण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील महिलांनी तहसिल कार्यालय सेतू कार्यालय, अंगणवाडी, महिला व बाल विकास कार्यालय या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.
शासनाने कागदपत्रांची अट शिथिल केल्यानंतर लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले. १५ ऑगस्टपूर्वी अअर्ज दाखल केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे ३ हजार जमा होणार आहेत. ज्यांनी उशिरा अर्ज दाखल केलेत, अर्ज केले नाहीत, असे लाभार्थी व ज्यांनी अर्ज करूनही त्रुटी राहिल्या आहेत अशा लाभार्थ्यांचे पुन्हा अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने, या योजनेला गांभीर्याने न घेतलेल्या बहिणीची धावाधाव झाली आहे. तर ज्या महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे, अशा महिला मात्र भलत्याच खुश झाल्या आहेत. महिलांची गर्दी पाहता बँकेने रविवारी सुद्धा बँका उघडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते जेनेकरून महिलांच्या समस्याचे निराकरण करून सर्वांना या योजनेचा योग्यरित्या लाभ घेता यावा