Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

गडब येथील एस बी आय ए.टी.एम. फोडून; 16 लाख 51 हजार केले लंपास

Responsive Ad Here

गडब / सुरेश म्हात्रे

मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम अज्ञातांनी कटर च्या सहाय्याने फोडले असुन सदर ए.टी.एम मधुन 16 लाख 51 हजार 100 रुपयांचा धाडसी दरोडा टाकला आहे .
    याबाबत सविस्तर वृत्त असे की 'गडब हे गाव मुंबई-गोवा हायवे लागत असून तेथील परिसर दुकानांनी गजबजलेला आहे अशातच चोरट्यांनी स्टेट बँकेचे ए.टी.एम बुधवारी रात्री एटीएम गाळ्याचे शटर व एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने तोडून 16, लाख 51 हजार,100 रुपये चोरुन नेण्यात आले. 
वडखळ पोलीसस्टेशन मधून सदर बँकेला १५ जुन रोजी लेखी नोटीस दिली होती त्या मध्ये सदर एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक ठेवावे व योग्य त्यावेळी सायरन चा वापर होणे गरजेचे आहे यासंदर्भात लेखी सूचना बँकेला देण्यात आल्या होत्या .तरीही बँकेच्या हलगर्जीपणामुळे सदर चोरीची घटना घडली असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे गावातील व इतर मुंबई गोवा लगत गडब गावाजवळ असणाऱ्या गाळेधारकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले आहे .जर बँकेने पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन केले असते तर आज या गुन्ह्याला आळा बसला असता .
या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सुचनेनुसारअप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे व डी वाय एस पी शिवाजी फडतरे यांचे मार्गर्शनाखाली वडखळ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे अधिक तपास करीतआहेत.