गडब/अवंतिका म्हात्रे
जिल्हा सरकारी रुग्णालयासाठी शिंदेसरकारने सात मजली नवीन इमारत मंजूर केली आहे. यासाठी १५० कोटी ६८ लाख रुपयांचा निधी खर्ची होणार आहे.
अत्यंत अत्याधूनिक अशा सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. लवकरच या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमीपूजन होणार आहे. त्यामुळे जिल्हा सराकारी रुग्णालय आता हायटेक होताना दिसणार आहे.
⚫ *नवीन इमारतीच्या प्रस्तावाला हाय पॉवर कमिटीची मान्यता*⚪
⚫ *रुग्णालयात अद्यावत सोयी सुविधा होणार उपलब्ध*⚪
⚫ *आ.महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांना मोठे यश*⚪
जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने ती पाहून, नवी इमारत बांधावी अशी मागणी गेली अनेक वर्ष होत होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी साकारात्म भुमिका घेतली. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रोजेक्ट रिपोट बनवला आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पाठपुरवा करन इमारत मंजूर करुन घेतली. खरे तर त्यांचा हा मास्टस्ट्रोकच असल्याचे मानले जाते.
मुंबईत बुधवारी झालेल्या हाय पॉवर कमिटीच्या बैठकीत या सरकारी रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि चीफ सेक्रेटरी उपस्थितीत होते.
रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाची
नवी इमारत सात मजली असणार आहे. २
लाख स्केअर फूट इतके बांधकाम करण्यात
येणार आहे. यामध्ये ३८० बेडस्ला शासनाने
मंजुरी दिली आहे. सुमारे सव्वा ४०० कोटी
रुपये या रुग्णायलयाचे अंदाजपत्रक आहे.
पैकी इमारत बांधकामासाठी १५० कोटी ६८ लाख निधी मंजूर होणार असून याबाबत एक
दोन दिवसात शासन निर्णय होईल असे आ.
महेंद्र दळवी यांनी सांगितले. केंद्राच्या नियमानुसार पब्लिक हेल्थ सेंटरच्या मान्यतेनुसार खाजगी पद्धतीचे अद्यावत असे बांधकाम केले जाणार आहे. ३०० बेडसह २० बेडचे वेगळे आयसीयू कक्ष असणार आहे. १६ बेडचे नवजात बालकक्ष, २० बेडचे डायलिसिस सेंटर, रुग्ण थांबा कक्ष, अपघात विभाग तसेच अपघात विभागात वेगळे शखक्रिया कक्षही उभारले जाणार आहे.
इमारतीत पाच मोड्युलर अद्यावत असे यंत्र सामुग्रीसह शस्रक्रिया कक्ष ही बांधले जाणार आहेत. यामध्ये अथम, अथों, जनरल, सी रोग शत्रक्रिया कक्ष असणार असून एचआयव्हि, एचएसबी बधितासाठीही वेगळे शस्रक्रिया कक्ष असणार आहे. याशिवाय लाँड्री, पाककक्ष, क्षकिरण कक्ष, चार लिपट, दोन जिने एक रॅम्प अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे.
रुग्णालयाच्या इमारतीत शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असतात. डॉक्टर्स आणि परिचारीका यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांचा या इमारतीत सतत वावर असतो. अशा परिस्थितीत इमारत दुर्घटनाग्रस्त झाली. तर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रुग्णांचे जीवही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी नवीन इमारत आवश्यक होती. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अद्यावत असे जिल्हा रुग्णालय जिल्ह्यातील जनतेसाठी मिळणार आहे.
*आमदार म्हणून निवडूण देणाऱ्या जनतेसाठी काही करता येत आहे, माझ्या हातून समाजहिताचे काम घडत आहे याचा मला खूप आनंद आहे. या सरकारी रुग्णालयात जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला योग्य आरोग्य सुविधा मिळणार आहे. जनतेची अनेक वर्षांची मागणी होती. ती मागणी मी सरकार दरबारी मांडली आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रतिसाद दिला. याबदल त्यांचेही मनापासून आभार मानतो.*
- *महेंद्र दळवी, आमदार, - अलिबाग- मुरुड मतदारसंघ*