✍️गडब / अवंतिका म्हात्रे
राष्टवादी काँग्रेस पाटीॅचे प्रदेश अध्यक्ष तथा कोकणचे भाग्यविधाते रायगडचे लोकप्रिय खासदार मा.श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने रायगडची लेक महीला बालकल्याण मंत्री मा. अदितीताई तटकरे यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनातून पेण तालुकास्तरीय भव्य पाककला स्पर्धा संपन्न झाली .
यंदा या पाककला स्पर्धेचे हे तिसर वर्ष होते सदर स्पर्धेचे उद्घाटन पेण शहर अध्यक्ष जितेद्र ठाकुर , साजन पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . यावेळी सभा अध्यक्ष वसुधा पाटील पेण तालुका राष्ट्वादी अध्यक्ष चैताली पाटील, पेण तालुका उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष शालन सावंत, तालुका उपाध्यक्ष जयश्री पाटील पेण तालुका युवती अध्यक्ष मुस्कान झटाम पेण तालुका चिटणीस मिनाक्षी पाटील पेण शहर अध्यक्ष सुचिता चव्हाण युवती तालुका अध्यक्ष तृप्ती म्हाते तालुका सदस्य रजनी भोईर तन्वी हजारे स्वाती म्हामुणकर, सुजाता शिंदे, सरिता म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महीला सहभागी होवून उस्फूर्त प्रतिसाद दीला या स्पर्धेत कोकणात पिकणारेधान्य,फळ,भाज्या,नारळ,मासे या पासून बनवलेले खाद्यपदार्थ बनवून आणले
त्यात केळीच्या पानांचा केक,सांदण,सुरणाची बिर्यानी, फणसाची वडी,शहाळ काजु भाजी,रानभाज्यांचे कटलेट,शेवळाची भाजी,नाचणिचे मोदक,अरबिच्या पानांचे थालीपिठ,मॅगो खिर विड्याच्या पानांचे मोदक चिंबोरी रस्सा पापलेट फ्राय अशा अनेक पदार्थाची चव चाखता आली
पाककला स्पर्धेतिल विजेत्या महिलांना बक्षिस स्वरूपात
प्रथम क्र .-पूजा योगेश उले (रेफ्रिजरेटर)
.द्वितीय क्र.-कांचन कुंदन म्हात्रे (मायक्रोवेव्ह ओव्हन )
तृतीय क्र.- हर्षदा हर्षल चाचड (मिक्सर)
चतुर्थ क्र. शैला प्रमोद तुरे ( डीनर सेट)
पाचवा क्र . - रुपेश्री राजेंद्र म्हात्रे (डीनर सेट)
प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्य सदर स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून डॉ मनिषा म्हात्रे, संगीता पाटील यांनी काम पाहिले . सदर स्पर्धेचे सुत्रसंचालन पेण युवती अध्यक्ष मुस्कान झटाम यांनी पाहीले