Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण मध्ये जुगाराच्या अड्डे तेजीत;पेण पोलिसांचे दुर्लक्ष!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

पेण शहरानजीक काही बाहेरील धनदांडग्यांच्या कृपेने जुगार क्लबचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. या अवैध धंद्यामुळे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. जुगाराच्या आहारी जाऊन तरुणाई बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील पेण पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पेणमध्ये विविध व्यवसाय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून येथील मंडळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. काही महिला खाडीतून मच्छी आणून ते विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे पेण शहराचे एक वेगळी ओळख आहे. कष्टकऱ्यांचा गाव म्हणून ओळखले जाते. मात्र पेण शहरात जुगाराची लागण लागलेले इसम गावोगावी दिसत आहेत मात्र हे जुगाराच्या अड्डे कायमचे बंद करण्यासाठी तरुण पिढी पुढे सरसावली आहे. या गोष्टीकडे
पेण पोलिसांचे दुर्लक्ष
गावाच्या नजीक काही बाहेरील धनदांडग्यांनी जुगाराचा धंदा खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. ज्या ठिकाणी धंदा सुरु आहे, त्या परिसरात महिलांची मच्छी गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबरच जुगार अड्ड्यापासून काही अंतरावर शाळादेखील आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. दिवसा-रात्री जुगार अड्डा चालत असल्याने त्याचा परिणाम काही कुटुंबांवरही होत आहे.
पेण पोलिसांना या अड्ड्याबाबत माहिती असतानादेखील कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तरी जिल्हाप्रमुख सोमनाथ घारगे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.