Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️त्या’ ताईच्या मृत्यूचे ‘राजकारण’ करू नये; तिन्ही नराधमांना यमसदनी धाडण्यास देशाची न्यायव्यवस्था सक्षम आहे♦️

Responsive Ad Here



✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

       नवी मुंबईतील एका ताईची विकृत मानसिक वृत्तीच्या तीन लोकांनी शिळ-डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्या केली. ही बाब अनंत यातना देणारी व निंदनीय आहे. परंतु, आता विविध आणि विशेषतः विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांकडून या घटनेवर राजकारण करण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब तिरस्कारणीय आहे.
कौटुंबिक वादातून उदभवलेल्या रागातून ‘त्या’ ताईने राहते पारिवारिक घर सोडले. तदनंतर ती अनोळखी अश्या ठिकाणी गेली. मदतीच्या नावाखाली तीन नराधमांनी त्या ताईवर अत्याचार करून, गुन्हा लपविण्यासाठी तिचा खून केला. पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे ते तिन्ही आरोपी किमान पुराव्यासाहित पोलिस कोठडीत आहेत. आणि, नव्याने लागू झालेल्या कायद्यान्वये या तिघांनाही न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून अतिवेदनादायी शिक्षा होईलच.
     परंतु, त्या अगोदरच विरोधी बाकावरील राजकीय पक्षांनी सवयीप्रमाणे राजकीय आरोपांच्या फैरी झाडत सत्ताधारी पक्ष व त्यातील नेत्यांवर बिनबुडाचे शरसंधान करण्यास प्रारंभ केला आहे. अटक, न्यायालयीन कारवाई, साक्षीपुराव्यांची शहानिशा व त्यांनतर आरोपीला शिक्षा असा संपूर्ण क्रमवार प्रक्रिया होण्यास अवधी लागणार आहे. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेला ठेंगा दाखवत व न्यायालयीन प्रक्रियेस कमी लेखत थेट राजकीय व्यवस्थेतील सत्ताधाऱ्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून स्वतःची राजकीय पोळी भाजून/पॉलिटिकल मायलेज मिळवण्याची धडपडही तितकीच निंदनीय आहे.