Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झालेः अजित पवार

Responsive Ad Here
 गडब/सुरेश म्हात्रे

⬛अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ आज सकाळी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, विरोधकांकडून करण्यात येणारी टीका आणि त्यांच्यावर मध्यंतरीच्या काळात करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, आपण विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्या आहेत, असंही अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्काना उधाण आलं आहे.राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही.
 पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणाले. मी जे काही करतो, त्यात जनतेच्या हिताचाचा विचार करतो. विकासाच्या चाकाला
अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात चालू असतो. त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवला आहे. त्यामुळे जे लोक अर्थसंकल्पावर नाकं मुरडत आहेत, त्यांचे चेहरे नीट बघून ठेवा. ही तीच लोकं आहे ज्यांना तुमच्या दारी विकासाची गंगा पोहोचू द्यायची नाही, सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
काहीजण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुरेशी तरतूद नसल्याची तक्रार करत आहेत. मी अर्थसंकल्प सादर करत होतो, तेव्हा हे लोक झोपलेले होते का? आम्ही दूध उत्पादकांसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केलं. या
लोकांना त्याची खबरबातही नाही. विरोधकांचं राज्याच्या विकासाशी देणं-घेणं नाहीये. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. आम्ही गावखेड्यातल्या लोकांसाठी योजना दिल्या. पण त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी आमचा विकास हाच एक मुद्दा आहे. तुम्हाला विरोधकांकडून फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही अशा घाणेरड्या राजकारणात अडकू नका. तुम्ही भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जपून आणि दूर राहा. काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहा, त्यांनाच मतदान करा, असं आवाहन अजित पवारांनी राज्यातील जनतेला केलं आहे.अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही तर महायुतीने उत्तर दिलं पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावर आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनी अजित पवारांवर आरोप केले. त्यामुळे याचं उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे.
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी शरद पवार गट