Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️बोरी येथील येशुबाई म्हात्रे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी जागृती म्हात्रे हीला अटक .♦️♦️

Responsive Ad Here


✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
          ♦️आरोपी : जागृती म्हात्रे♦️
                                                

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

 रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राज्य महामार्गावरील वडखळ नजीक बोरी येथे पागोळीचे पाणी फिरविण्यात सांगितले असता त्याचा राग येवून जागृती जगू म्हात्रे यांनी मारहाण करीत दमदाटी करीत असल्याची तक्रार वडखळ पोलिस ठाण्यात यशुबाई दत्तात्रेय म्हात्रे यांनी केली आहे.
     पेण तालुक्यातील बोरी येथे दिनांक 18/07/2024 रोजी फिर्यादी राहते घराचे बाहेर, पेण येथे महिला फिर्यादी रा. बोरी, पेण व आरोपीत रा. बोरी, पेण हिचे पागोळीच्या पाण्यावरून जुना वाद आहे. 18/07/2024 रोजी खुप पाउस असल्याने आरोपी हीचे पागोळीचे पाणी फिर्यादी हिचे स्वयपांक
खोलीत येत असल्याने फिर्यादी हीने आरोपी हिस तिचे घराचे पागोळीचे पाणी फिरविणे बाबत सांगितले असता आरोपीत हीने फिर्यादी हीचे बोलण्याकडे लक्ष न दिल्याने फिर्यादी हीने तिचे पागोळीचे पनेल काठीने फाडले या गोष्टीचा आरोपीत हिने मनात राग धरून फिर्यादी हीस लाकडी दांडक्याने डोक्यात उजवे हातावर, उजवे पायावर मारून दुखापत केली तसेच हाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळी व दमदोटी केली. 
        याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.122/2024, BNS 118[1],352, 351[2] [3], 115 [2] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ; फिर्यादी येशुबाई म्हात्रे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे व हात फ्रेक्चर झाला असून अलिबाग जिल्हा रुग्नालय येथे उपचार सुरू आहेत . अखेर आरोपी जागृती म्हात्रे यांना अटक झाली असून  कोर्टात हजर केले व एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली असून उद्या पुन्हा त्यांना कोर्टात हजर करणार आहेत  . अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्याच्या मार्गदर्शना खाली पाटील हे करीत आहेत.