गडब/सुरेश म्हात्रे
⬛आज सेंट्रल स्कूल आमटेम येथे , सेंट्रल स्कूल आमटेम व शाळा व्यवस्थापन समिती आमटेम व ग्रामपंचायत आमटेम व वनविभाग निगडे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक जुलै ते सात जुलै हा वृक्षारोपण सप्ताह या निमित्ताने माननीय सरपंच साहेब लक्ष्मणजी तांबोळी एसएमसी अध्यक्ष जनार्दन जी तांबोळी रवीजी वृषाली ताई अस्मिता ताई रामफळ ताई त्याचबरोबर मुख्याध्यापक सौ. वावेकर मॅडम ग्रामसेविका मालती मॅडम वनविभागाचे अधिकारी वारगे भोईरजी व पेडवी तसेच शाळेच्या मॅडम सुजाता मॅडम नंदिनी मॅडम व भाग्यश्री मॅडम कपाळे मॅडम आणि महेंद्र पाटील व सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण चा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न केलa झाडे किती महत्त्वाची ,आहेत, आपण झाडे लावली नाहीत जगवली नाहीत तर मानव जगणार नाही.
पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल त्यामुळे प्रत्येकानं एक तरी झाड लावावं व जगवावं असं शाळेचे शिक्षक महेंद्र पाटील यांनी अतिशय सविस्तर व कळकळीन सर्वांना सांगितलं आणि झाडांमध्ये करंज आवळा चिंच सुरू आपटा अशी विविध प्रकारची झाडे लावली व सर्वांचे आभार मानून झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा देऊन ही घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.