Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद - पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे*♦️♦️

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

.   बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. महिला बालविकास विभाग, रायगड अंतर्गत बालकल्याण समिती व पोलिस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण सन्मान सोहळा व ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बेलत होते. यावेळी कोकण मार्गदर्शक अॅडव्होकेट सीमा अदाते, बाल कल्याण समिती सदस्य डॉ गाणार, अॅड श्रीमती झेमसे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन जयवंत गायकवाड, कॅलिडा रिहॅबचे डॉ. प्रशांत, डॉ. संतोष पवार, डॉ. अक्षय पाटील उपस्थित होते. या वेळी बालकांच्या क्षेत्रात कायद्याला अनुसरून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन पोलीस अधीक्षक श्री घार्गे व बालकल्याण समिती चे अध्यक्ष श्री जगन्नाथ साळुंखे व सदस्य यांचे हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालकांच्या प्रति काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करून बालकांप्रती काम करण्यासाठी प्रेरणा ऊर्जा उत्साह निर्माण करणे. बालकांची जास्तीत जास्त काळजी व संरक्षणाची जबाबदारी घेऊन बालकांचे पुनर्वसन करणे तसेच तनावाचे व्यवस्थापन करणे. यासाठी कॅलिडा रिहॅब सेंटर व भूमिका फाउंडेशन चे मोठे योगदान व मार्गदर्शन मिळाले याबाबत पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक करून बालकल्याण समितीला धन्यवाद दिले.या कार्यक्रमात बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मायने. महाड), श्री श्री राजेंद्र मायने निवृत्ती बोराडे (माणगाव), श्री सुरेंद्र गरड (कर्जत), श्रीमती प्राची पांगे, श्रीमती माधुरी घाडगे, श्रीमती वर्षा पाटील तर नवी मुंबईचे सुनील होलार, अभिजीत मोरे, दत्तात्रय पवार, संतोष पिलाने, श्रीमती प्रणिता भाकरे, श्रीमती सारिका बोराटे, रेल्वे पोलीस आदी उकृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रम  ात राहुल धुळे यांचा निरोप समारंभ करून उपस्थित संस्थेच्या व संपर्क बालग्रामचे विनायक पाटील, संपर्क बाल ग्रामचे श्री खंदारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे जि.प. जयवंत गायकवाड डॉ विशाल गाणार, अॅड आधाते अॅड झेमसे यांनी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.