Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर♦️♦️

Responsive Ad Here


✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

    शैक्षणिक साहित्य हे अध्यापन पध्दतीचा आत्मा आहे. खास करून लहान बर्माला, हजारो शब्दांचे काम एखादे शैक्षणिक साहित्य करून जाते यांची जाणीव रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना असल्याने स्वःता शैक्षणिक साहित्य तयार करण्यावर मी शिक्षक म्हणून नेहमीच भर दिलेला आहे.
त्यासाठी अधिकचा वेळ शाळा संपल्यानंतर देऊन अभ्यासपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार केली. व सतत करत आहे. इतर तज्ञ मार्गदर्शक त्याच बरोबर शैक्षणिक साहित्य निर्मितीची पुस्तके व आपली कार्यकुशलता बापरून सतत नवनवीन शैक्षणिक साहित्य तयार करण्यावर मी भर दिला आहे.
या साहित्यामध्ये बहुविविध विषयांसाठी साहित्य तयार करणे, गणित विषय भाषा विषय इंग्रजी विषय सामान्य ज्ञान विषय या विषयांवर आतापर्यंत अनेक सैक्षणिक साहित्य तयार करण्यात आली, ती कशी करावी यांची मार्गदर्शिका सुध्दा तयार करण्यात आली आहे.
त्याच बरोबर शासनाने वेळोवेळी पुरविलेल्या साहित्याचा उपयोग मुध्दा दररोजच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत करण्यात येत आहे.
आमच्या उंबर्डे केंद्रातील शिक्षकांना सुध्या याचे वेळोवेळी आवश्यकतेनुसार मार्गदर्शन केले जाते. त्यांना सुध्दा शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. केंद्रप्रमुखांकडून यासाठी कते मटेरीअल दिले जाते. त्यासाठी कार्यशाळा सुध्दा आयोजित करण्यात येते.
आमची रायगड जिल्हा परिषद अंतोरे शाळा नेहमीच केंद्रात आघाडीवर असते आमच्या शाळेतील टीमवर्क, विद्यार्थी, पालक, शाळाप्रमुख, महकारी शिक्षक यामुळे ही गोष्ट शक्य होते.
केवळ शैक्षणिक साहित्य तयार केले जात नाही तर त्याची निगा मुध्दा राखली जाते. त्यांचे जतन सुध्दा केले जाते. त्याच बरोबर शासनाने पुरविलेल्या साहित्याचा वापर करून झाल्यानंतर ते साहित्य उचलून योग्य जागी ठेवण्याची सवय विद्यार्थी मित्रांना करून दिलेली आहे.
एखादी माहिती शिक्षकाने सांगितली म्हणून तेच प्रमाण मानण्या ऐवजी स्वतःच्या अनुभवातून वापरातून कृती करून पडताळून पाहणे महत्वाचे असते. विसरणे माणसाचा स्वभाव गुण आहे. परंतु सतत एकाच गोष्टीचा सराव केल्यास तीच गोष्ट अधिक मुलभ होते. आणि विध्यार्थ्यांच्या लक्षात राहते.
शोधक वृत्ती जिज्ञासा या माणसाच्या मनाच्या प्रवृत्ती असतात. मनातील प्रश्नांचा पध्दतशीरपणे शोध घेणे ही प्रवृत्ती मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली जाते.
शैक्षणिक साहित्याच्या वापराचे फायदे
१) सूक्ष्म निरीक्षणाची सवय लावणे.
२) गणित शैक्षणिक साहित्य हाताळणे.
३) गणित विषयाची भीती दूर करणे.
हा उपक्रम घेण्यामागचे कारण म्हणजे गणित विषयातील सर्वच संकल्पना ह्या केवळ तोंडी अथवा लेखी पध्दतीने समजतीलच असे नाही. तर कधी प्रात्यक्षिकाची जोड लागते. त्यासाठी शैक्षणिक साहित्याच्या वापरातून उत्तर कसे शोधावे हे केवळ गणित शैक्षणिक साहित्याच्या वापरातूनच समजू शकते. त्यासाठी प्रयम ते कसे हाताळावे हे समजणे गरजेचे आहे. ते प्रचम शिक्षक समजावून सांगतील व त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल,

 *गणित अध्यापनासाठी वापरण्यात येणारे साहित्य.* 

कालमापन चक, बेरीज वजाबाकी चक्र उजळणी तक्ते एकक ठोकळे, दनक ठोकळे शतक पाटी, मीटर पट्टी खडे, इत्यादी

 *मुलांनी स्वतः वापरलेले साहित्य त्यातून सोडविलेली उदाहरणे* 

१) संख्या ओळख
२) बेरीज वजाबाकी सोडविणे.
३) उंची मोजणे रंदी मोजणे.

 *मुलांना होणारे फायदे* 

१) मुले स्वतः उदाहरणे सोडवीत असल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते.
२) शैक्षणिक साहित्य हाताळण्याची सवय लागते.
३) मुले कृतीचा आनंद घेऊ शकतात.
४) मुलांमध्ये गणित विषयची भीती दूर होते.
५) मुलांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होते.
    कमी वेळेत उदाहरणे सोडविण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन गणिताच्या तामाला कंटाळणारी मुले मणिताच्या तासाला बसून स्वतः उदाहरणे सोडवायला लागली. शैक्षणिक साहित्य हाताळणीची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. आणि गणित अध्यापनाची गोडी वाढण्यास मदत
झाली. अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य निर्मितीचे उपक्रम सर्व शाळांमध्ये होणे गरजेचे असून शिक्षकमित्रांनी आपला जास्तीचा वेळ देऊन आपल्या विद्यार्थ्यांना गणित अध्यापनामध्ये सोयीक्सर व सोप्या होणाऱ्या गोष्टी करत राहिले पाहिजे .

श्री. राजेंद्र महादेव पाटील, (सहशिक्षक) रायगड जिल्हा परिषद शाळा अंतोरे, ता. पेण, जि. रायगड 
 एम.ए.बी.एड. मुंबई विद्यापीठ एम.ए.एज्युकेशन, मुंबई विद्यापीठ एल.एल.बी. मुंबई विद्यापीठ डी.एस.एम. (य.च.मु.वि. नाशिक) पी.एच.डी. (अँपिअर) मुंबई विद्यापीठ*