✍️गडब / अवंतिका म्हात्रे
वयाची साठी आली. घरी कुटुंबाचे प्रेम भरपूर माया, नातवंडाचा सहवास तरीपण मैत्रीचे नाते काही वेगळेच असते. ४१ वर्षाची अतूट मैत्री. मैत्री ही अशी आहे की, आपुलकी, जिव्हाळा कहिही नाते नसतांना नात निर्माण करणे ही खरी मैत्री . आणि याचे कारणही असेच आहे .शारदा विद्यामंदीर कासू. ता पेण येथील एस्. एस्.सी १९८३च्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा स्नेहसंमेलन ( गेट टूगेदर) कार्यक्रम हेमनगर ता अलिबाग येथील गार्डन अॅन्ड रिसोर्ट येथे संपन्न झाल. विशेष म्हणजे रिसोर्टचे मालक श्री. दामोदर केणी हे सुद्धा या बॅचचे विद्यार्थी त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्या येथे व्हावा अशी त्यांची इच्छा असल्याने तेथे सदर कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश पूजन करण्यात आले . त्यावेळी प्रदिप तांडेल यांची कन्या दिव्या हिने आपल्या सुमधूर गायणातून गणेश गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रविण जोशी यांनी अतिशय उत्कृष्ठरित्या केले. सर्वांनी प्रथम आपली ओळख व अत्यंत भावनात्मक प्रसंग सांगत आपापली मैत्री घट्ट केली .
यावेळीनोकरी निमित्त खंडाळा पुणे मुंबई पेन तसेच आमचे पांडापूर कासू पेजारी इतर ठिकाणी राहणारे कार्यक्रमाला उपस्थित होतेदामोदर केणी प्रवीण जोशी श्री व सौप्रदीप तांडेल गणेश मात्रे प्रमोद काकडे वासुदेव म्हात्रे तुकाराम नाईक लक्ष्मण नाईक गजानन म्हात्रे रुक्मिणी बोरकर कमलाकर मोकल , नरेंद्र नाईक , सदानंद तांडेल , श्री व सौ सुरेखा पाटील ' व कुटुंबातील इतर नातेवाईक उपस्थित होते
यावेळी कुटुंबाने आपुलकीने केलेले सहकार्य मोलाचे ठरले .