गडब/सुरेश म्हात्रे
राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची धूम
आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्याकरिता राज्य सरकारने ही योजना आणली असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. तर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना या योजनेसाठी राज्य सरकार निधी कुठून आणणार आहे? असाही प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही टीका केली आहे.
या सर्व घोषणा आहेत. मला असं वाटतं की, प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद- दुसरा हप्ता देण्याचा प्रयत्न होईल. एखाद-दुसरा हप्ता देऊन जनमानस निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. हे तात्पुरतं आहे. निवडणुकीच्या पूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत, अशी चर्चाही नागरिकांमध्ये आहे,
अशी टीका शरद पवारांनी केली.