गडब/सुरेश म्हात्रे
गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा नाहक त्रास गडबवासीयांना होत आहे. देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या अन्य कामामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीकडून वर्षभर दुरुस्तीचे काम सुरू असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला विशेष दुरुस्त्या केल्या जातात. यावर लाखोंच्या खर्च होतो. मात्र तरीही हवेची झुळूक येतात वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे वीज ग्राहकांच्या मनस्ताप होत असून असे का, असा प्रश्न वीज ग्राहकांकडून विचारला जातो. गडब गावा शेजारील जे.एस.डब्ल्यू कंपनीत दिवसातून कित्येक तास लाईट चालू असते या गोष्टीकडे महावितरण लक्ष द्यायला तयार नाही.
येथील मोठी लोकसंख्या गावखेड्यात आहे. विद्युत वितरण कंपनीचे मोठे जाळे ग्रामीण गावखेड्यांत आहे. उन्हाळ्यात वीज खंडित होण्याची
तांत्रिक कारणे असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वेगळ्या कारणांनी वीज पुरवठा खंडित होते. उन्हाळ्यात चिनी मातीचे इन्सुलेटर प्रसरण पावतात. पावसाळ्यात पाऊस पडतात तडकतात त्यामुळे दुरुस्तीचे काम करावे लागते. त्याला दोन-तीन दिवस लागत असतात. हवेमुळे वीज तारा एकमेकांना घर्षण करतात. त्यामुळेच स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होतो. वीज खांबावर किंवा शेजारी वीज पडल्यास प्रभावाने इन्सुलेटर फुटतात. उन्हाळ्यात अचानक विजेच्या वापर वाढतो. त्यामुळे डीपीवरील फ्युज उडतात व वीज पुरवठा खंडित होतो. विजेच्या धक्का लागण्याची दुर्घटना घडल्या वीज पुरवठा खंडित केला जातो. गेल्या काही दिवसांपासून गावात हवा किंवा पाऊस बरसल्यास बत्ती गुल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.