गडब/सुरेश म्हात्रे
⬛पेणच्या गणेशमूर्तीना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे पेणसह रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती भवनात आयोजित कार्यक्रमात भौगोलिक मानांकन पेणच्या गणपतीमूर्ती व्यवसायिकांना बहाल केले आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तीना स्वतःची विशेष ओळख निर्माण झाली आहे.*"जिल्हाधिकारी जावळे* *यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल*
पेण हे गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. गणेशमूर्तीना देशासह जगभरातून मोठी मागणी असते. अनेक कुटुंब गणेशमूर्ती बनविण्याच्या व्यवसायात पिढ्यानपिढ्या काम करीत आहेत. वर्षभर गणपती कारखान्यात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली आहे. या व्यवसायातून पेण तालुक्यात करोडोंची उलाढाल दरवर्षी होत
असते.. येथील गणेशमूर्ती हे प्रसिद्ध असल्याने काहीजण पेणच्या नावाने गणेशमूर्ती विक्री व्यवसाय करून ग्राहकांची फसवणूक
करीत असतात. त्यामुळे मुर्ती व्यवसायिकांना फटका बसत होता. यासाठी गणेशमूर्ती व्यवसायिकांनी दीड वर्षापूर्वी भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे
पाठपुरावा केला होता. त्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने पेणच्या गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र दिले आहे.