Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

*लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी मिळणार गिफ्ट,बँक खात्यात जमा होणार एवढ्या महिन्यांचं मानधन*❗

Responsive Ad Here


   ✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे* 
         राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहवायस मिळते. आता या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी गिफ्ट मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केली आहे.
     महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करावेत असं आवाहन अजित पवारांनी केलंय.. तसंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिली आहे. रक्षाबंधन सणापूर्वी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रित रित्या बँक खात्यावर जमा केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमात केली.
   जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या योजनेचे मानधन रक्षाबंधनापूर्वी एकत्र मिळणार यामुळे लाडक्या बहीणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच या योजनेचा लाभ महिलांनी जास्तीत जास्त घेण्यासाठी ग्रामपंचायतीने शिबीर लावल्याचेही सर्वत्र पहावयास मिळते. जेनेकरून महिलांची फॉर्म भरण्यास गैरसोय होऊ नये त्यामुळे महित्यावर्ग खुप आनंदात असल्याचे पहावयास मिळते.