Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

राष्ट्रवादीचा विधानसभेचा प्रारंभ बारामतीपासून१४ जुलै रोजी जाहीर सभा उपमुख्यमंत्री अजित पवार इलेक्शन मोडवर

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

⬛लोकसभा निवडणुकीत
समाधानकारक यश न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत. ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक लक्षात ठेवून पक्षाने १४ जुलै रोजी बारामतीमध्ये जाहीर सभा आयोजित केली आहे.
नरिमन पॉईंट येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक आपल्या
लोककल्याणकारी योजनांवरच आपण लढणार आहोत. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिला, युवा, शेतकरी, वारकरी, दुर्बल, आदिवासी, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजासाठीच्या क्रांतिकारी योजना लोकांपर्यंत घेऊन जा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच लोकशाहीवादी आणि समतेची भूमिका जपणारा पक्ष आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला आपल्या पक्षाचा विरोध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले.
आपण अर्थसंकल्पात कृषीपंपाच्या वीजविलमाफीचा निर्णय घेतला. तो अनेकांना आवडला आहे. महिलांसाठी दरमहा दीड हजार रुपये या योजनेचे राज्यभरात स्वागत होत आहे. बळीराजाला कायम मोफत
वीज मिळेल यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप अशी योजना आपण आणली आहे. सौरऊर्जेचे हे धोरण शेतकऱ्यांनी आनंदाने स्वीकारले आहे, असा दावाही त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकांमध्ये आपला पक्ष केवळ चार जागांवर लढला. त्यामधे एक जागा आपण जिंकली. आपण आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य दिले आहे.
महायुती सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिलेदार म्हणून आपण अर्थसंकल्पातील सर्व योजनांचा सामान्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळेल यासाठी रात्रंदिवस कार्यरत रहा, असे आवाहन तटकरे यांनी केले.