✍️गडब / अवंतिका म्हात्र
कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक सार्वजनिक वाचनालय खारपाडा तालुका पेण यांच्या मागणीनुसार सी एफ आय संस्था पेण यांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत दुश्मि खारपाडा हद्दीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा माजी सरपंच तथा कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडाचे अध्यक्ष सौ रश्मी दयानंद भगत यांच्या हस्ते कै मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय खारपाडा सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी दुष्मी खारपाडाच्या ग्रामपंचायत सदस्य अनिता भालचंद्र भगत ह भ प नारायण पाटील संस्थेच्या सदस्या अनिता भगत रामा म्हात्रे चंदू पाटील सी एफ आय संस्थेच्या रिया गावडे सीता पवार तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ रश्मी दयानंद भगत यांनी सीएफआय संस्थेचे चेअरमन किशोर देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सालाबाद प्रमाणे संस्थेच्या वतीने मागणी केल्यानुसार गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहे कार्यक्रम सुरू करण्या पूर्वी कै पोशीबाई महादेव मोरे ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहनात आली