Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️रस्त्यातपडलेल्या पत्रकार सुभाष टेंबे याला दवाखान्यात नेले म्हणून ओंकार म्हात्रे याला मारहाण; आरोपी फरार

Responsive Ad Here



✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे .
           जखमी ओंकार म्हात्रे


       पेण तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली असून मळेघर येथे राहणारे संकेत पांडूरंग म्हात्रे यांनी अशी खबर दिली की मी  ४/६/२०२४ रोजी घरी असताना रात्री ८ वाजता माझा भाऊ ओंकार म्हात्रे हाआंबेगाव येथील मित्र उत्तम वाघ याचे वाढदिवसाचे कार्यक्रमाकरिता गेला असता मीघरी असताना दिनांक ५/६/२०२४रोजी पहाटे तीन वाजता चे सुमारास आमचे शेजारी राहणारे मनोज लक्ष्मण मोकल व माझा चुलत भाऊ राजेश रमेश म्हात्रे हे आमचे घरी आले व त्यांनी मला सांगितले की सरकारी हॉस्पिटल पेन येथून ओंकार म्हात्रे यांचे फोनवरून पोलिसांनी फोन केला होता तुझा भाऊ ओंकार हा सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आपल्याला तेथे बोलाविले आहे असे पोलिसांनी सांगितले मी माझे चुलत भाऊ राजेश रमेश म्हात्रे व आमचे शेजारी राहणारे मनोज लक्ष्मण मोकल असे आम्ही पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटाचे सुमारास सरकारी हॉस्पिटल पेन येथे आलो तेव्हा भाऊ ओंकार मात्रे हा पेन सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता त्याचे पोटाला डावे बाजूचे मोठी जखम झाली होती व त्या जखमेतून पोटातील आतड्या दिसत होत्या रक्ताने त्याचे टी-शर्ट माखलेले होते त्याचे डोक्यात जखम होऊन त्यातून रक्त येऊन ते कपाळावर सापळलेले होते त्याचे डावे डोळ्याचा भाग काळा पडलेला होता डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत होते त्याची तब्येत क्रिटिकल असल्याचे व त्याची ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ताबडतोब घेऊन जा असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले .
      आम्ही पेन येथील कल्पेश ठाकूर यांची ॲम्बुलन्स बोलावून घेऊन त्यामधून भाऊ ओंकार म्हात्रे याला आम्ही एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे घेऊन जात असताना मी व माझी आई लता पांडुरंग म्हात्रे असे आम्ही भाऊ ओंकार म्हात्रे यांच्यासोबत अॅम्ब्युलन्स मध्ये होतो तसेच माझे सोबत असलेले आमचे गावातील इतर लोकही दुसऱ्या खाजगी गाडीतून आमचे मागून येत होते तेव्हा भाऊ ओमकार मात्रे याचे जवळ आम्ही बोलत असताना तुला कोणी मारले असे विचारले असता त्याने मला सांगितले की मी आंबेगाव येथे माझे मित्राचे बर्थडे च्या कार्यक्रमासाठी गेलो होतो घरी येताना रस्त्यामध्ये पत्रकार सुभाष टेंबे हे पडलेले दिसले म्हणून मी त्यांना पेन सरकारी दवाखान्यात आणले थोड्यावेळाने तेथे कल्पेश बोरेकर व त्याचे सोबत त्याचे मित्र आले कल्पेश बोरेकर याने मला तू सुभाष टेंबे यांना दवाखान्यात का आणलेस असे बोलून तो हॉस्पिटलमध्ये माझे जवळ बाचाबाची व शिवीगाडी करीत होता म्हणून हॉस्पिटलमधील नर्स ने आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले आम्ही बाहेर गेल्यावर कल्पेश बोरेकर व त्याचे मित्रांनी मला हाता बुक्याने तसेच लातेने मारहाण केली व कल्पेश बोरेकर यांनी माझे पोटात चाकू मारला त्यानंतर त्यांनी माझे डोक्यात दगड मारीत मला हॉस्पिटलमध्ये आणले असे भाऊ ओंकार म्हात्रे यांनी त्याचे भावाला आईला गाडीत सांगितले त्यानंतर आम्ही भाऊ ओंकार म्हात्रेला एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे उपचार करता ऍडमिट केले आहे.सदर केसचा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत . या केसचा तपास पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शना खाली ठाणे अमलदार करीत आहेत .