गडब / सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब गावातील विद्यार्थी व कामगार वर्गाची हेलसांड होऊ नये म्हणून गडब गावच्या सरपंच सौ मानसी मंगेश पाटील यांनी रामवाडी - पेण येथील एसटी महामंडळ अधिकारी सौ अपर्णा वर्तक यांना आपल्या मागणीचे नियोजन देण्यात आले असून सदर नियोजनामध्ये गडब गावासाठी सकाळ व संध्याकाळी गडब - पेण एसटी सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गडब गावातून विद्यार्थीवर्ग व कामगार वर्ग यांची गैरसोय होऊ नये या हेतूने सदर निवेदन देण्यात आले आहे.
तसेच गडब येथील थांब्यावर वाट बघुनही कोणत्याही प्रकारच्या जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यापुर्वी सुद्धा गडब गावातील पत्रकार तथा पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष सौ अवंतिका म्हात्रे यांनी रामवाडी येथील वाहतुक शाखा अभियंता श्री प्रशांत खरे यांना निवेदन दिले होते तसेचे पेन येयील एस टी महामंडळ अधिकारी सौ अपर्णा वर्तक यांना भेटून गडब पेण एसटी थांबवण्या विषयी कळवीले होते.