Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️ *पावसाच्या सुरुवातीलाच पेण एस टी स्थानकाची दुरावस्था ! पुढे काय ?* ♦️प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे मात्र हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

Responsive Ad Here


*गडब/अवंतिका म्हात्रे
       रायगड जिल्ह्यातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण असून कोकणाकडे जाण्यासाठी पेण हे कोकणाचे प्रवेशद्वार आहे. कोकणात जाण्यासाठी आणि येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशी वर्ग एस टी महामंडळाच्या एस टी बसेसचा उपयोग करत आहेत पण एस टी महामंडळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाच्या सुरुवातीलाच एस टी स्थानकाची दुरावस्था होत असल्याने प्रवाशी वर्गातून नाराजीचे सूर ऐकू येत आहे.
     पेण एसटी स्थनकात पहिल्याच पावसाचे पाणी साठल्याने स्थानकाची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे, स्थानकातील रस्ताही उखडला असून वाताहात झाली आहे यामुळे प्रवाशांचे मात्र एस टीतून प्रवास करताना व एस टी पकडताना हाल होत आहे.

पेण शहरातील नागरिकांची नव्याने एसटी स्थानक व सुसज्ज इमारत आगार निर्माण व्हावे ही मागणी आहे पण पेण एसटी स्थानकामध्ये विशेष करून पावसाळ्यामध्ये चिखल आणि पाण्याच्या तलावा सारखे सदृश्य परिस्थिती अनेक वर्षा पासुन नागरिकांना पहावयास मिळत आहे मात्र अद्यापही तीच अवस्था असल्याने प्रवाशीवर्गातून नाराजी दिसुन येत आहे. 
बस डेपो पाण्याने आणि चिखलाने भरल्याने एसटीमध्ये प्रवास करणे चढणे उतरणे नागरिकांना फार कष्टाचे बनले आहे. या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये असंतोष आहे. याला जबाबदार कोण ? लाल परी त्यातच महिला वर्गासाठी शासनाने दिलेली तिकिटामध्ये ५० % टक्के सवलत यामुळे अनेक महिला वर्गाचा एसटीने प्रवास करण्यासाठी निश्चितच एस टी ला पसंती दिली जात आहे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज आहे.