गडब/सुरेश म्हात्रे
⬛खासदार म्हणून
निवडून येण्यात व माझ्या विजयात पेणच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे येथील प्रलंबित प्रश्न नक्की सोडवले जातील, असे उद्गार खा. सुनील तटकरे यांनी पेण येथे काढले.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पेणच्या जनतेचे आभार मानण्यासाठी तटकरे हे पेणमध्ये आले होते. यावेळी तटकरे पुढे म्हणाले, आमचे पेण व श्रीवर्धनवर लक्ष होते. पेणने चांगले मताधिक्य दिले. आ. रवीशेठ पाटील व माजी आ. धैर्यशील पाटील यांनी दिलेला विश्वास खरा ठरला. आगामी विधानसभा निवडणुकीत रवी पाटील यांना अधिक लीड दयायचे आहे, असे स्पष्ट करून पेण तालुक्यातील वाशी खारेपाटातील पाणी प्रश्न, रेल्वे थांबाव्यात तसेच कॉरीडोअर, भावातील तफावत दूर केली जाईल, असे आश्वासन दिले.
तर आ. रवींद्र पाटील यांनी, पेणच्या विकासासाठी खा. सुनील तटकरे यांनी साथ द्यावी. ही घडी अशीच राहायला हवी, एकसंघता ठेवायला हवी. मतभेद विसरून एकत्र यायला हवे, असे स्पष्ट केले. यावेळी आ. अनिकेत तटकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी सभापती डी. बी. पाटील, प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार संघांचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप पेण तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी, विजय कदम आदी उपस्थित होते.